रत्नागिरी : आकांक्षा कदम, ओम पारकर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पदकविजेते
रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीची आकांक्षा कदम हिला २१ वर्षाच्या मुलींच्या गटात सुवर्ण तर १८ वर्षांखालील मुलांच्या गटात रत्नागिरीचा ओम पारकरला रौप्य पदक मिळाले. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे आणि
आकांक्षा कदम


ओम पारकर


रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत रत्नागिरीची आकांक्षा कदम हिला २१ वर्षाच्या मुलींच्या गटात सुवर्ण तर १८ वर्षांखालील मुलांच्या गटात रत्नागिरीचा ओम पारकरला रौप्य पदक मिळाले.

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे आणि दादरच्या सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूटच्या सहयोगाने आयोजित केलेल्या ५९ व्या ज्युनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत २१ वर्षाच्या मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत सिंधुदुर्गच्या दीक्षा चव्हाणवर १६-१५, ५-१८ व २१-४ असा निसटता विजय मिळवून बाजी मारली. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा आपल्या अनुभवाच्या जोरावर दीक्षा चव्हाणवर वरचढ ठरली. उपांत्य फेरीत आकांक्षा कदमने रिची माचिवले (मुंबई) हिचा २१-०० व २१-०० असा सरळ दोन सेटमध्ये प्रराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. १८ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात रत्नागिरीचा ओम पारकरवर पुण्याच्या आयुष गरुडने बाजी मारली. त्याने २१-११, १२-२ असा एकतर्फी विजय संपादन केला. ओम पारकरने उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या मनवार अब्बासवर ५-१८, २१-०० व १७-०४ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

राज्य कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, सहसचिव केतन चिखले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार व खजिनदार संजय देसाई यांच्या हस्ते विजेत्यांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले.

रत्नागिरीच्या आकांक्षा कदम व ओम पारकर या दोन्ही खेळाडूंची १ नोव्हेंबर २०२५ पासून मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे होणाऱ्या ५० व्या सबजुनियर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. त्याचे रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन व रत्नगिरी जिल्हा कॅरम खेळाडूंतर्फे अभिनंदन व स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande