हाँगकाँग विमानतळावर कार्गो विमान समुद्रात पडून अपघात; दोघांचा मृत्यू
व्हिक्टोरिया सिटी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। हाँगकाँगमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँग विमानतळावर सोमवारी (दि.२०) पहाटे एक मोठा विमान अपघात झाला. एक कार्गो विमान हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरत असताना धावपट्टीवरून घसरून थेट समुद्रात गेलं आणि
हाँगकाँग विमान अपघात


व्हिक्टोरिया सिटी, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। हाँगकाँगमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. हाँगकाँग विमानतळावर सोमवारी (दि.२०) पहाटे एक मोठा विमान अपघात झाला. एक कार्गो विमान हाँगकाँग इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरत असताना धावपट्टीवरून घसरून थेट समुद्रात गेलं आणि हा अपघात घडला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून, विमानातील चार क्रू मेंबर्सना सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, विमानाचा मागचा भाग समुद्रात बुडाला असून पुढचा भाग आणि कॉकपिट पाण्याच्या वर दिसत आहे. हा अपघात पहाटे सुमारे 3:50 वाजता हाँगकाँग विमानतळाच्या उत्तर धावपट्टीवर झाला. सद्यस्थितीत ती धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे, तर उर्वरित दोन धावपट्ट्या कार्यरत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, विमानतळावरील एका ग्राउंड व्हेइकलमधील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी विमानात कोणताही माल (कार्गो) नव्हता. हाँगकाँगच्या नागरी उड्डाण विभागाने सांगितले आहे की, ते या अपघाताच्या तपासासाठी संबंधित एअरलाईन्स व इतर यंत्रणांशी समन्वय साधत आहेत.

हे बोईंग 747 कार्गो विमान तुर्कीच्या एसीटी एअरलाईन्सकडून उडवण्यात आलं होतं आणि दुबईच्या अल मकतूम इंटरनॅशनल एअरपोर्ट (डीडब्ल्यूसी) वरून उड्डाण घेतलं होतं. हे विमान एमिरेट्स एअरलाईन्सकडून वेट लीजवर घेतलं गेलं होतं. म्हणजेच विमानासोबतच पायलट, क्रू, देखभाल आणि विमा याची जबाबदारीही एसीटी एअरलाईन्सकडेच होती, असे सांगण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande