मुंबई , 20 ऑक्टोबर (हिं.स.)।दिवाळीच्या खास निमित्ताने दाक्षिणात्य अभिनेता सलमान दुलकरच्या ‘कांथा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. यासोबतच चित्रपटाचा एक मोशन पोस्टरही शेअर करण्यात आला आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये 14 तारखेला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘कांथा’ या चित्रपटात दुलकर सलमान मुख्य भूमिकेत आहे. निर्मात्यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर करत लिहिले आहे, “दिवाळी आता अधिकच धमाकेदार झाली आहे. ‘कांथा’ हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.” यासोबत त्यांनी प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
या चित्रपटात दुलकर सलमानसोबत समुथिरकानी देखील प्रमुख भूमिकेत आहेत. ते चित्रपटात ‘अय्या’ नावाची भूमिका साकारत आहेत. अय्या हे दुलकर सलमान यांच्या पात्राचे वडील आहेत आणि ते एक उत्कट चित्रपटनिर्मातेही आहेत. अय्या एक हॉरर फिल्म बनवू इच्छितात, जी दक्षिणेतील पहिली हॉरर फिल्म असल्याचं दाखवलं जातं. चित्रपटात 1950 चे दशक उभं केलं आहे. अय्या आपल्या मुलाला (दुलकर सलमान) लहानपणापासूनच हिरो बनवण्याच्या तयारीला लागतो. मात्र याच गोष्टीमुळे पुढे जाऊन वडील आणि मुलामधील नात्यात दुरावा निर्माण होतो आणि संघर्ष वाढतो. हा चित्रपट वडील-मुलाच्या नात्यातील अनेक पैलू उलगडतो. तसेच, काही लोकांच्या सिनेमा विषयीच्या उत्कटतेलाही हा चित्रपट उजाळा देतो. ‘कांथा’ मध्ये नायिकेच्या भूमिकेत भाग्यश्री बोरसे झळकणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode