भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास मोठे टॅरिफ मोजावे लागेल - ट्रम्प
वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफच्या मुद्द्यावर भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली, तर त्याला “मोठ्या प्रमाणात” टॅर
ट्रम्प


वॉशिंग्टन, 20 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफच्या मुद्द्यावर भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, जर भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली, तर त्याला “मोठ्या प्रमाणात” टॅरिफ भरावा लागेल.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे की, भारताने जर रशियन तेलाची खरेदी कमी केली नाही, तर त्याला मोठ्या आयात शुल्काचा सामना करावा लागेल. त्यांनी दावा केला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वैयक्तिकरित्या आश्वासन दिले आहे की भारत अशा प्रकारची खरेदी थांबवेल.

एअर फोर्स वन या विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “ मी पंतप्रधान मोदींशी बोललो होतो. त्यांनी सांगितले की भारत रशियन तेल खरेदी करणार नाही. पण जर त्यांनी तसे केले नाही, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर टॅरिफ भरावे लागेल.” ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिका त्या देशांवर दबाव टाकत आहे जे अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियन तेल खरेदीमुळे मास्कोला युक्रेनमधील युद्ध चालू ठेवण्यास आर्थिक मदत मिळते.

दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या या दाव्याला फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात अशा कोणत्याही चर्चेची अधिकृत माहिती मंत्रालयाकडे नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की भारत आणि अमेरिकेतील ऊर्जा सहकार्यावर चर्चा सुरू आहे, परंतु ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याला कोणतीही पुष्टी दिली नाही की भारत रशियन तेल खरेदी थांबवण्यास सहमत झाला आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले, “स्थिर ऊर्जा दर आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे हे आमच्या ऊर्जा धोरणाचे दुहेरी उद्दिष्ट आहे.”

ही तिसरी वेळ आहे जेव्हा ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवर आणि पंतप्रधान मोदींनी दिलेल्या कथित आश्वासनावर असा दावा केला आहे. ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीप्रकरणी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावले आहे, त्यामुळे भारतावर एकूण टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जरी भारताने हा टॅरिफ ‘अन्यायकारक’ असल्याचे म्हटले असले, तरी ट्रम्प प्रशासनाने आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande