भोपाळ, २० ऑक्टोबर (हिं.स.)इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताला इंग्लंड विरुद्ध 4 धावांनी पराभव सहन लागला. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये टीम इंडियाचा हा सलग तिसरा पराभव होता. याआधी भारताला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभव पत्करावा लागला होता. संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानला हरवून स्पर्धेची सुरुवात केली होती.
या पराभवानंतरही, भारताला अजूनही उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे. इंग्लंड विजयासह उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. आता अंतिम स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात स्पर्धा आहे.
भारत सध्या पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे आणि न्यूझीलंडपेक्षा त्यांचा नेट रन रेट चांगला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
भारताचा पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे. जो उपांत्य फेरीतील स्थानाच्या शर्यतीत निर्णायक ठरू शकतो. भारताचा पुढचा सामना बांगलादेशशी होणा आहे. बांग्लादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडकडून पराभूत तर त्यांचा उपांत्या फेरीचा मार्ग खडतर होणार आहे. अशा परिस्थितीत, टीम इंडियाला बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेलच. पण शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड इंग्लंडकडून पराभूत होईल, अशीही आशा त्यांना करवीा लागणार आहे.
उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताची समीकरणे:
१. भारताला न्यूझीलंड आणि बांगलादेश दोघांविरुद्धही विजय आवश्यक.
२. न्यूझीलंडचा संघ पराभूत झाला तर बांगलादेशविरुद्ध मोठा विजय आवश्यक आणि इंग्लंडकडून न्यूझीलंडचा पराभव आवश्यक असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे