कोलकाता कसोटीची तिकिटे फक्त ६० रुपयांपासून उपलब्ध
भारत विरुद्ध द. आफ्रिका कसोटी मालिका कोलकाता, 20 ऑक्टोबर (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्
भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड लोगो


भारत विरुद्ध द. आफ्रिका कसोटी मालिका

कोलकाता, 20 ऑक्टोबर (हिं.स.)दक्षिण आफ्रिकेचा संघ पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिला सामना १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते ऑनलाइन अ‍ॅपद्वारे तिकिटे देखील बुक करू शकतात. ज्याची किंमत दररोज ६० रुपये (पाच दिवसांसाठी ३०० रुपये) पासून सुरू होते. तिकिटे दररोज २५० रुपये (संपूर्ण सामन्यासाठी १,२५० रुपये) मध्ये देखील उपलब्ध असणार आहेत.

जवळजवळ 6 वर्षांनी कोलकातामध्ये कसोटी सामना खेळला जाणार आहे. १४ ते १८ नोव्हेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यापूर्वी, २०१९ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात येथे एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता. भारतीय संघाने विजय मिळवला. हा कसोटी सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला होता.एवढेच नाही तर १३ वर्षांत प्रथमच भारतीय संघ ईडन गार्डन्स स्टेडियमवर महान फलंदाज विराट कोहलीशिवाय कसोटी सामना खेळणार आहे. किंग कोहलीने अलीकडेच कसोटी स्वरूपाचा निरोप देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. यापूर्वी, २०२४ मध्ये भारतीय संघाला टी-२० जेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याने टी-२० स्वरूपातून निवृत्ती घेतली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande