भोपाळ, 20 ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना इंग्लंडविरुद्धच्या पराभवाला विसरू शकत नाही आणि तिने पराभवासाठी स्वतःला जबाबदार धरले आहे. मानधना मानते की, तिच्या बाद झाल्यामुळे फलंदाजीचा क्रम बिघडला. मानधना म्हणाली की, तिचे शॉट सिलेक्शन अधिक चांगले असू शकले असते. २८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत एका वेळी चांगल्या स्थितीत होता. पण शेवटी या संघाला पराभव पत्करावा लागला. मानधना म्हणाली की, तिने ८८ धावा केल्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत १२५ आणि दीप्ती शर्मासोबत ६७ धावांच्या भागीदारी केल्या. पण चुकीच्या वेळी ती पॅव्हेलियनमध्ये परतली. आणि सामन्यात इंग्लंडला पुनरागमन करण्याची संधी मिळाली.
मानधना म्हणाली, मला वाटते की,, आम्ही आमच्या शॉट सिलेक्शनसह चांगले करू शकलो असतो. सुरुवात माझ्यापासून झाली, म्हणून मला वाटते की, आमचे शॉट सिलेक्शन चांगले असायला हवे होते. आम्हाला प्रति षटक फक्त सहा धावांची आवश्यकता होती. कदाचित आम्हाला खेळ पुढे नेला पाहिजे होता. मी याची जबाबदारी घेते कारण विकेट पडण्याची सुरुवात माझ्यापासून झाली.
पहिल्या चार सामन्यांमध्ये पाच गोलंदाजांच्या संयोजनासह खेळल्यानंतर, संघ व्यवस्थापनाने इंग्लंडविरुद्ध गोलंदाजी आक्रमण मजबूत करण्यासाठी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जच्या जागी वेगवान गोलंदाज रेणुका सिंगला संधी देण्याचा निर्णय घेतला. मानधना म्हणाली, गेल्या दोन सामन्यांमध्ये, आम्हाला निश्चितच वाटले की पाच गोलंदाजी पर्याय पुरेसे नाहीत. विशेषतः इंदूरच्या सपाट खेळपट्टीवर. म्हणून, आम्हाला वाटले की, पाच गोलंदाजांसह जाणे आमच्यासाठी नुकसानकारक ठरेल. रॉड्रिग्जसारख्या खेळाडूला वगळणे हा खूप कठीण निर्णय होता. पण कधीकधी, संतुलन राखण्यासाठी तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात. भविष्यात आम्ही पुन्हा असे करू असे नाही. आम्ही परिस्थितीनुसार निर्णय घेऊ.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे