रत्नागिरी : स्वरूप मांजरेकरची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील स्वरूप धीरेंद्र मांजरेकर (बारावी संयुक्त- कला) याची रत्नागिरी जिल्हा वरिष्ठ टेनिस क्रिकेट संघातून नवव्या वरिष्ठ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट
स्वरूप मांजरेकरला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपस्थित विद्यार्थी खेळाडू आणि शिक्षक


रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील स्वरूप धीरेंद्र मांजरेकर (बारावी संयुक्त- कला) याची रत्नागिरी जिल्हा वरिष्ठ टेनिस क्रिकेट संघातून नवव्या वरिष्ठ राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिपकरिता अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे.

ही स्पर्धा २८ ते ३१ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत नाशिक येथे होणार आहेत. स्वरूप हा कुंडी (ता. संगमेश्वर) गावचा रहिवासी असून, त्याने क्रिकेटचे धडे आपल्या गावात गिरवले आहेत. स्वरूपचे पूर्ण प्राथमिक शिक्षण कुंडी गावात झाले असून, माध्यमिक शिक्षण देवरूखच्या न्यू इंग्लिश स्कूल व गुरुवर्य काकासाहेब सप्रे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे.

स्वरूप मांजरेकरची रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल व आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना प्रमुख प्रा. धनंजय दळवी, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. वसंत तावडे आणि क्रीडा प्रशिक्षक संजय इंदुलकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही स्वरूपचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande