अभिनेत्री तेजस्विनी लोणारी केला साखरपुडा
मुंबई , 27 ऑक्टोबर (हिं.स.)।मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूपपणे साखरपुडा केला आहे. नुकताच सोशल मीडियावर तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले असून तेजस्विनी राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोण
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी


मुंबई , 27 ऑक्टोबर (हिं.स.)।मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने गुपचूपपणे साखरपुडा केला आहे. नुकताच सोशल मीडियावर तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले असून तेजस्विनी राजकीय कुटुंबाची सून होणार आहे.

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने शिवसेना युवानेते समाधान सरवणकर यांच्यासोबत साखरपुडा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांचे ते सुपुत्र आहेत. दोघांनी 27 ऑक्टोबर 2025 रोजी साखरपूडा केला. या प्रसंगी अनेक मान्यवर राजकीय नेते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. दरम्यान, तेजस्विनी लोणारीने साखरपुड्याला लाल रंगाची साडी नेसून मोकळे केस सोडले आहेत. अभिनेत्री या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसते आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

तेजस्विनी लोणारीने 'छापा काटा', 'वॉण्टेड बायको नंबर वन', 'चित्तोड की राणी पद्मिनी का जोहूर', 'गुलदस्ता', 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा', 'अफलातून', 'कलावती' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.तसेच अलिकडेच ती 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेमध्ये दिसली. याशिवाय 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande