‘थलायवा' चित्रपटानंतर रजनीकांत सिनेसृष्टीला निरोप देणार?
मुंबई , 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकताच ''कुली'' हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. तर आता ते ''जेलर २''च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. जेलरचा पहिला भाग तुफान गाजला होता. रजनीकांत यांची लोकप्रियता कमी झालेली
‘थलायवा' चित्रपटानंतर रजनीकांत सिनेसृष्टीला निरोप देणार?


मुंबई , 30 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांनी नुकताच 'कुली' हा ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. तर आता ते 'जेलर २'च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. जेलरचा पहिला भाग तुफान गाजला होता.

रजनीकांत यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. आजही त्यांची युनिक स्टाईल, डायलॉगबाजी आणि अभिनय पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होत असते. दरम्यान सर्वांचे हे फेवरेट अभिनेते काही वर्षात निवृत्त होणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत आता वाढतं वय आणि स्वास्थ्य संबंधी कारणांमुळे लवकरच रिटायरमेंट घेणार आहेत. सध्या त्यांचं वय ७५ आहे. याही वयात ते अॅक्टिव्ह आहेत.चित्रपटाच्या शूटसाठी कित्येक ठिकाणी दौरे करत आहेत. 'जेलर','कुली','वेट्टाइया' सारखे हिट चित्रपट त्यांनी गेल्या दोन वर्षात दिले आहेत. त्यांचे आगामी चित्रपटही रांगेत आहेत. त्यात 'जेलर २'चा समावेश आहे. याशिवाय त्यांच्याकडे आणखी ४ चित्रपट आहेत. त्यातील एका चित्रपटात ते कमल हासन यांच्यासोबत अनेक वर्षांनी स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटानंतर मात्र रजनीकांत सिनेसृष्टीतून निवृत्ती घेतील असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच रजनीकांत आणि कमल हासन यांनी त्यांच्या चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट कोण दिग्दर्शित करणार हे अद्याप ठरलेलं नाही. २०२७ साली या चित्रपटचं काम प्रत्यक्षात सुरु होईल. रिपोर्टनुसार, हा थलायवा रजनीकांत यांचा शेवटचा सिनेमा असणार आहे. तब्बल ३५ वर्षांनी रजनीकांत आणि कमल हासन एकत्र काम करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande