रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ दुसरा फलंदाज
चंदीगड , 27 ऑक्टोबर (हिं.स.)पृथ्वी शॉ ने इतिहास रचला आहे. तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावणारा दुसरा फलंदाज बनला आहे. २५ वर्षीय या फलंदाजाने चंदीगड येथे चंदीगड विरुद्ध ही कामगिरी केली. २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या ग्रुप बी टप्प्यातील
पृथ्वी शॉ


चंदीगड , 27 ऑक्टोबर (हिं.स.)पृथ्वी शॉ ने इतिहास रचला आहे. तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावणारा दुसरा फलंदाज बनला आहे. २५ वर्षीय या फलंदाजाने चंदीगड येथे चंदीगड विरुद्ध ही कामगिरी केली. २०२५-२६ रणजी ट्रॉफीच्या ग्रुप बी टप्प्यातील सामना २५ ऑक्टोबरपासून चंदीगड येथे महाराष्ट्र आणि चंदीगड यांच्यात खेळला जात आहे. पहिल्या डावात स्वस्तात बाद झालेला शॉ दुसऱ्या डावात परिपूर्ण फलंदाजी करताना पहायला मिळाला. डावाची सुरुवात करताना त्याने एकूण १५६ चेंडूंचा सामना केला आणि १४२.३१ च्या स्ट्राईक रेटने २२२ धावा काढल्या. आपल्या या स्फोटक खेळीत त्याने २९ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार लगावले.

पृथ्वी शॉ ने सामन्यादरम्यान ७२ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले आणि नंतर १४१ चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. यासह, तो रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज बनला. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या नावावर सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम आहे. त्यांनी १९८५ मध्ये बडोद्याविरुद्ध फक्त १२३ चेंडूत द्विशतक झळकावले होते.

पहिल्या डावात पृथ्वी शॉ फक्त ८ धावांवर बाद झाला होता. निशांक बिर्लाच्या गोलंदाजीवर जगजीत सिंगने त्याला झेलबाद केले होते. दुसऱ्या डावात अर्जुन आझादच्या गोलंदाजीवर शॉ २२२ धावांवर बाद झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande