लग्नाच्या १४ वर्षांनी टीव्ही कपल जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट ?
मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी जय भानुशाली आणि माहि विज यांनी तब्बल 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. काही काळापूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला आहे. हि बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी आता मोठा धक्
लग्नाच्या १४ वर्षांनी टीव्ही कपल जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट


मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी जय भानुशाली आणि माहि विज यांनी तब्बल 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. काही काळापूर्वीच दोघांचा घटस्फोट झाला आहे. हि बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी आता मोठा धक्का ठरली आहे.

माध्यमांच्या माहितीनुसार, दोघांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि आता जुलै ऑगस्ट 2025 मध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.दरम्यान, जय आणि माहि बऱ्याच काळापासून एकमेकांपासून वेगळे राहत होते. नातं टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण निष्फळ ठरले. रिपोर्टनुसार, मुलांच्या कस्टडीबाबत दोघांमध्ये आता एकमत झाले आहे. दोघांनी आपसांत समजुतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मुलांच्या जीवनावर याचा कमीतकमी परिणाम होईल.

जय आणि माहि साल 2011 मध्ये विवाहबंधनात अडकले. दोघेही तीन मुलांचे पालक आहेत. त्यांची मुलगी तारा, जिने 2019 मध्ये जन्म घेतला आणि दोन दत्तक मुले राजवीर आणि खुशी, ज्यांना त्यांनी 2017 मध्ये दत्तक घेतले. दोघेही आपल्या मुलांवर अतिशय प्रेम करतात आणि सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे आनंदाचे क्षण शेअर करत असतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande