
कॅनबेरा, 29 ऑक्टोबर (हिं.स.)कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे वाया गेला आणि सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाने दोनदा सामन्यात व्यत्यय आणला. सुरुवातीला पाच षटकांनंतर सामना थांबवण्यात आला. पण दोन षटकांचा खेळ कमी झाल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आला. सामना पुन्हा सुरू झाल्यावर प्रत्येकी १८ षटके खेळण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताने ९.४ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ९७ धावा केल्या होत्या. पण पुन्हा मुसळधार पावसामुळे सामना थांबला. आणि सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही आणि सततच्या पावसामुळे सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्यात भारताकडून शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. खेळ थांबेपर्यंत गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी ६२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार २४ चेंडूत ३९ धावांवर नाबाद राहिला. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले, तर गिल २० चेंडूत ४ चौकार आणि एक षटकार मारून ३७ धावांवर नाबाद राहिला. अभिषेक शर्मा १९ धावांवर बाद झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे