इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला; ३० हून अधिक लोकांचा मृत्यू
जेरुसलेम , 29 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा शांतता करार अखेर अपयशी ठरला आहे. इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ग
इस्रायलचा गाझावर पुन्हा एकदा हवाई हल्ला


जेरुसलेम , 29 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गाझा शांतता करार अखेर अपयशी ठरला आहे. इस्रायलने पुन्हा एकदा गाझावर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझावर जोरदार हल्ला करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी हा निर्णय हमासकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे घेतला आहे. ट्रम्प यांनी जगातील अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत हा शांतता करार घडवून आणला होता, परंतु आता या कराराच्या उल्लंघन झाले आहे.

अहवालानुसार, इस्रायली हल्ल्यांत आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी हमासवर गंभीर आरोप करत सांगितले की, हमासने इस्रायली सैनिकांवर हल्ला केला आणि मृत बंधकांना परत करण्याच्या अटीचे उल्लंघन केले.दुसरीकडे, हमासने दावा केला आहे की त्यांनी कोणताही हल्ला केलेला नाही आणि त्यांनी शांतता करार तोडलेलाही नाही.

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अत्यंत संतप्त झाले आहेत. त्यांनी हमासवर रोष व्यक्त करत म्हटले की, हमासने युद्धविराम (सीजफायर) तोडला आहे. नेतान्याहू यांनी पुढे सांगितले की, हमास ट्रम्पच्या शांतता कराराच्या अटींनुसार वागत नाही. त्यांनी आधी इस्रायली बंधकांना परत करण्यास नकार दिला आणि जेव्हा त्याबद्दल विचारले गेले तेव्हा कारणे सांगू लागले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हमास यांच्यात शांतता करार घडवून आणला होता, परंतु आता त्यांच्या या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. इस्रायलने हमासवर युद्धविराम तोडल्याचा आरोप केला आहे, तर हमासने हा आरोप सरळ फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी शांतता करारासाठी १० महत्त्वाचे मुद्दे ठेवले होते, ज्यांमध्ये बंधकांना मुक्त करण्याचाही उल्लेख होता. परंतु आता हे सर्व मुद्दे पूर्णपणे अंमलात येताना दिसत नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande