श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा १०१ वा विजयादशमी महोत्सव अमरावती, 3 ऑक्टोबर (हिं.स.) देशाला बलवान करायचे असेल तर समाजाला बलवान करावेच लागणार, याच राष्ट्रभक्तीच्या ध्येयांनी प्रेरित (कै.) अंबादासपंत व अनंत वैद्य बंधुंनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना १९१४ मध्ये केली. समाजाला युवापिढीला मैदानी खेळांतून सक्षम करण्यासाठी १९२५ पासून विजयादशमी महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. १०९ वर्षांहून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ विजयादशमी महोत्सवाचे आयोजन करीत असून, गुरूवारी २ ऑक्टोबरला दसरा मैदान येथे सायंकाळी ५ वा. १०५१ व्या विजयादशमी या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. देशातील ५ हजार विद्यार्थी पारंपारीक व आधुनिक खेळ, चित्तथराक कवायती व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधले.
विदर्भाचे कुलदैवत श्री अंबादेवी श्री एकवीरा देवी शारदीय महोत्सवाचा समारोप दशमीला व अंबामातेच्या सिमोल्लंघन सोहळ्यातून होतो. या वेळी देवीच्या स्वागतासाठी दसरा मैदान येथे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा विजयादशमी सोहळा राष्ट्रभक्तीला ऊर्जा देणारा ठरतो. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित या सोहळ्याला प्रमुखअतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, डायरेक्टर जनरल व सीईओ बिहार राज्य खेळ प्राधिकरणाचे रवींद्रन शंकरन, क्रीडा भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री प्रसाद महानकर, अपर आदिवासी आयुक्त जितेंद्र चौधरी, मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे, सचिव डॉ. विकास कोळेश्वर, सचिव प्रा. रवींद्र खांडेकर, प्रा. प्रणव चेंडके, प्रा. दीपा कान्हेगावकर यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
गोला, भाला, दांडपपट्टा ड्रिल, विटाफेक, सिंगल दांड पट्टा, डबल दांडपट्टा, लेझीम, सिंगल लाठी, दो हाती तलवार, ढाल तलवार, एरोबिक्स, योगा ड्रिल, बॉक्सींग तायक्वांडो, बॉडी बिल्डींग, टॉर्चेस मार्चिग व समुहगान असे पारंपारीक व आधुनिक खेळांच्या कवायती व सादरीकरण सादर करण्यात आले दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाला अमरावतीकर नागरिकांनी मात्र चांगलीच गर्दी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी