लातूर : पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत लोककल्याण मेळावा संपन्न
लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत “लोक कल्याण मेळावा” संपन्न झाला. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची पुनर्रचना करून सदर योजनेला माहे मार
अ


लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजने अंतर्गत “लोक कल्याण मेळावा” संपन्न झाला.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची पुनर्रचना करून सदर योजनेला माहे मार्च २०३० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शहरातील फेरीवाले , छोटे व्यावसायिक यांना याचा लाभ होणार आहे. . यात नवीन कर्ज प्रस्ताव स्वीकारणे, प्रस्ताव मंजूर करणे, वाटप करणे , फेरीवाले यांचे डिजिटल ओंनबोर्डिंग करणे, फेरीवाले यांचे स्ट्रीट फूड फेरीवाले यांचेसाठी प्रशिक्षण आयोजित करणे हे कामे करण्यात आली.

शहरातील खाद्य पदार्थ विक्री करणारे पथ विक्रेते यांचेसाठी अन्न सुरक्षा याबाबत भालचंद्र ब्लड बँक सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षणाचे उद्घाटन उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व पथ विक्रेते यांना सदर प्रशिक्षण खाद्य पदार्थ विक्री करताना महत्वाचे असल्याचे सांगून योजनेत कर्ज मर्यादा मध्ये सुधारणा झाली असून आता नवीन पहिले कर्ज १०००० /- रु. वरून १५०००/- रु. , दुसरे कर्ज मर्यादा २००००/- रु. वरून २५०००/- रु. , इतकी वाढविण्यात आली असून तिसरे कर्ज ५००००/- रु. असणार आहे त्याचा लाभ घ्यावा.

याशिवाय योजनेचा लाभ घेणारे ज्यांनी दुसरे कर्ज वेळेवर नियमितपणे परतफेड केली आहे. अशा लाभार्थ्यांना क्रेडीट कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे अचानक उद्भवणाऱ्या व्यवसाय व वैयक्तिक अडचणीसाठी तात्काळ आर्थिक मदत मिळू शकेल, असे सांगितले. अन्न व भेसळ प्रतिबंधक कार्यालयाचे प्रशिक्षक योगेश वंजारे यांनी उपस्थिताना सदर प्रशिक्षण दिले. यात त्यांनी प्रत्येक पथ विक्रेते यांनी व्यवसाय करताना काळजी घ्यावी व शासनाच्या सूचनांचे वेळोवेळी पालन करावे असे सांगितले.

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande