अर्धापूरात (जि. नांदेड) अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) - जिल्ह्यातील अर्धापूरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले आहेत. अर्धापूर तालुक्यातील येळेगांव कारखाना येथील तरूण शेतकरी परमेश्वर नारायण कप
अ


नांदेड, 3 ऑक्टोबर (हिं.स.) - जिल्ह्यातील

अर्धापूरात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

घटनास्थळी पोलिस पोहचले आहेत.

अर्धापूर तालुक्यातील येळेगांव कारखाना येथील तरूण शेतकरी परमेश्वर नारायण कपाटे (24) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मयत परमेश्वर कपाटे यांच्या पॅंटच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे.त्यात सततची नापिकीमुळे व अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, नौकरी,कर्ज या कारणांमुळे आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठी मिळाली आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हैराण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande