लातूर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।
आधीच अल्पभूधारक, डोक्यावर कर्जाचा भार आणि त्यातच अतिवृष्टीमुळं सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने पीक हातचं गेलं. यामुळं पुढं काय होणार या विवंचनेतून थोडगा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील भास्कर रावसाहेब तरडे यांनी मृत्यूला कवटाळलं होतं. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सांत्वनपर भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लातुर जिल्ह्यात नुकसान झाले आहे शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार हे अहमदपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. अहमदपूर तालुक्याच्या दौऱ्यामध्ये जाण्याची शेतकऱ्यांची संवाद साधला. शेती पिकाचे नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणे केली आहे.
यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. घरातील कर्त्या व्यक्तीची आत्महत्या हा त्या कुटुंबासाठी खूप मोठा धक्का असतो. त्यामुळं कुणीही आत्महत्या करुन आपल्या कुटुंबाला उघड्यावर टाकू नये. असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis