
टोरोंटो, ३० ऑक्टोबर (हिं.स.)भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंगची प्रभावी मालिका कॅनेडियन ओपन २०२५ च्या उपांत्य फेरीत संपुष्टात आली. १७ वर्षीय या खेळाडूला इंग्लंडची नंबर १ खेळाडू जीना केनेडीने ११-५, ११-८, १२-१० असे सरळ सेटमध्ये पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना फक्त ३० मिनिटे चालला.
अनाहतने यापूर्वी स्पर्धेत दोन मोठे अपसेट केले या स्पर्धेत केले होते. जागतिक क्रमवारीत २० व्या क्रमांकाची मेलिसा अल्वेस आणि गतविजेती टिनी गिलिस यांना पराभूत करून उपांत्य फेरीत पोहोचली होती.
सामन्यानंतर जीना केनेडीने अनाहतचे खूप कौतुक केले. ती म्हणाली, अनाहतने या आठवड्यात उत्कृष्ट खेळ केला. मी माझ्या प्रशिक्षकांना सांगितले की, ती एक नैसर्गिक स्क्वॅश खेळाडू आहे. तिचे शॉट्स बदलण्याची तिची शैली खूप अनोखी आहे आणि ती शिकवता येत नाही. कदाचित ती एका आठवड्याच्या खेळामुळे थोडी थकली असेल, जे स्वाभाविक आहे.अंतिम फेरीत, जीना केनेडीचा सामना इजिप्तच्या अमिना ओर्फीशी होईल, जिने दुसऱ्या उपांत्य फेरीत अमांडा सोभीला पराभूत केले.
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे