
पुणे, 30 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.आयुक्तांकडून काही दिवसांपूर्वी सुनावणी घेण्यात आली होती, यावर आज निर्णय देण्यात आला. मात्र गोखले बिल्डरला व्यवहाराचे पैसे आणि स्टॅंप ड्यूटीचे पैसे मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.
व्यवहार रद्द करण्यासाठी बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टी यांनी प्रतिज्ञापत्र दिले होत. या व्यवहाराचे सेल डीड येत्या २ आठवड्यात कागदोपत्री रद्द व्हावे, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती. यावर आज धर्मदाय आयुक्तांनी निर्णय दिला. सिव्हिल कोर्टाच्या आदेशनांतर गोखले बिल्डरला २३० कोटी मिळणार आहेत तसचे स्टॅंप डयूटीची रक्कम परत मिळवण्यासाठीही बिल्डरला कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे.
मॉडेल कॉलनीतील मोक्याच्या ठिकणी असलेली जैन बोर्डिंग जागा गोखले कंस्ट्रक्शन कंपनीला २३० कोटींना ट्रस्टीकडन विकण्यात आल्याचा प्रकार समोर येताच जैन समाजासह विरोधकही आक्रमक झाले. या विरोधात मोर्चाही काढण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टींसह, माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले. हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी साठी गेले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु