
- ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर अभियानात्मक उपक्रम राबवला जाणार
मुंबई , 30 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन अनिवार्य करण्याचे आदेश दिले आहेत. ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरातील सर्व शाळांमध्ये हा अभियानात्मक उपक्रम राबवला जाणार आहे. स्वर्गीय बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या ऐतिहासिक गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी आदेशानुसार, आतापर्यंत शाळांमध्ये सामान्यतः ‘वंदे मातरम्’ या गीताचे फक्त पहिले दोन पद गाण्याची प्रथा होती. मात्र, ३१ ऑक्टोबर २०२५ (कार्तिक शुद्ध नवमी) रोजी या गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी सर्व शाळांमध्ये पूर्ण वंदे मातरम् गीताचे गायन करण्यात येईल.
यासोबतच शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित प्रदर्शन (एक्झिबिशन) आयोजित करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना या राष्ट्रगीताची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व समजावून सांगता येईल.
सरकारने हेही स्पष्ट केले आहे की ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यभरातील सर्व शाळांमध्ये हा अभियानात्मक उपक्रम राबवला जाईल. या काळात ‘वंदे मातरम्’चे संपूर्ण गायन तसेच प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येईल. शासनाने या निर्णयासंबंधीचा संदर्भपत्र शिक्षण विभागाला पाठवला असून सर्व शैक्षणिक संस्थांना या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode