
सोलापूर, 30 ऑक्टोबर (हिं.स.)महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून दि. 3,4 आणि 5 नोव्हेंबर या तीन दिवशीय हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये सायंकाळी 6.30 वाजता गझल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अमोल धाबळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्या प्रयत्नाने गझल महोत्सव ३,४,५ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेला आहे.या गझल महोत्सवा मध्ये कवन प्रस्तुत अक्षर अक्षर तुझेच आहे (गझल विशेष मैफल), गझलनवाज भीमराव पांचाळ यांचे शब्द सुरांची भावयात्रा, तसेच वैभव जोशी आणि दत्तप्रसाद रानडे यांचा सोबतीचा करार (गझल मैफल) या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड