'सूर्याची पिल्ले' नाटकाच्या संपूर्ण टीमने घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन
धाराशिव, 30 ऑक्टोबर (हिं.स.)सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित ''सूर्याची पिल्ले'' या गाजलेल्या नाटकाच्या संपूर्ण टीमने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. नाटकातील सर्व कलाकार श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरात दाखल झाले हो
सुनील बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, अतिशा नाईक, शर्वरी पाटणकर,


धाराशिव, 30 ऑक्टोबर (हिं.स.)सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित 'सूर्याची पिल्ले' या गाजलेल्या नाटकाच्या संपूर्ण टीमने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. नाटकातील सर्व कलाकार श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूरात दाखल झाले होते.

नाटकातील प्रमुख कलाकार सुनील बर्वे, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव, अतिशा नाईक, शर्वरी पाटणकर, उमेश जगताप आणि सुहास परांजपे यांनी सकाळी श्री तुळजाभवानी देवींचे मनोभावे दर्शन घेत श्री तुळजाभवानी देवींची आरती केली. देवीच्या दर्शनावेळी सर्व कलाकारांमध्ये अपार श्रद्धा आणि प्रसन्नतेचे वातावरण पाहायला मिळाले.

या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी सर्व कलाकारांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन सन्मानित केले. यावेळी मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, नागेश शितोळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

'सूर्याची पिल्ले' हे नाटक प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केले असून अभिनेते सुनील बर्वे हे या नाटकाचे निर्माते आहेत.

दर्शनानंतर नाटकातील सर्व कलाकारांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी नाटकाच्या यशस्वी प्रवासासाठी प्रार्थना केली. “देवीच्या कृपेने नाटकाला यापुढेही उत्तम प्रतिसाद मिळावा आणि प्रत्येक प्रयोगात प्रेक्षकांचे प्रेम तसेच आशीर्वाद लाभावा,” अशी भावना या वेळी अभिनेते सुनील बर्वे यांनी व्यक्त केली

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande