
केपटाउन, 30 ऑक्टोबर (हिं.स.) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी घोषणा केली की त्यांच्या आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान दुर्मिळ खनिजे (रेअर अर्थ) याबाबत करार झाला आहे. ट्रम्प यांनी सांगितले की चीनने पुढील एक वर्षासाठी अमेरिकेला रेअर अर्थ पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी हेही जाहीर केले की चीनवर फेंटानिल (अमली पदार्थ) संदर्भात लावण्यात आलेले शुल्क 10 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची गुरुवारीच दक्षिण आफ्रिकेतील बुसान येथे भेट झाली. या भेटीदरम्यान दोघांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. ट्रम्प म्हणाले की अमेरिका आणि चीन यांच्यातील सर्व वाद मिटवले गेले आहेत. तसेच त्यांनी हेही सांगितले की चीनसोबतचा करार आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल. हे संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरेल.ट्रम्प यांनी पुढे सांगितले की शी जिनपिंग आणि त्यांच्यात रशिया–युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी सहकार्याबाबतही चर्चा झाली. त्यांनी म्हटले, “युक्रेनचा मुद्दा बैठकीत ठळकपणे मांडला गेला. आम्ही यावर बराच काळ चर्चा केली आणि दोघे मिळून या विषयावर काय करता येऊ शकते, ते पाहणार आहोत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode