टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट
सियोल, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबत सुरू असलेल्या व्यापारिक वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सौम्यतेचे संकेत दिले आहेत. अलीकडेच ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड र
कॅनडासोबतच्या टॅरिफ तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची कार्नी यांच्याशी झाली भेट


सियोल, 30 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडासोबत सुरू असलेल्या व्यापारिक वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सौम्यतेचे संकेत दिले आहेत. अलीकडेच ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्याशी संबंधित एका कथित “खोट्या” जाहिरातीमुळे कॅनडाविरुद्ध व्यापारिक तणाव अधिक वाढवला होता.

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि ट्रम्प यांची दक्षिण कोरियातील एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन (APEC) शिखर परिषदेदरम्यान बुधवारी रात्री झालेल्या एका जेवणावेळी भेट झाली. एअर फोर्स वनवरील पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “काल रात्री आमची त्यांच्याशी अतिशय चांगली चर्चा झाली.” त्यांच्या या वक्तव्याला कॅनडासोबतच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये सुधारणेचे चिन्ह म्हणून पाहिले जात आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला होता.

हि भेट अशा वेळी झाले, जेव्हा गेल्या आठवड्यात अमेरिका आणि कॅनडामधील संबंध अधिकच ताणले गेले होते. ट्रम्प यांनी अलीकडेच कॅनडातून येणाऱ्या आयातीवर 10 टक्के अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली होती. त्यांनी आरोप केला होता की कॅनडाने 26 ऑक्टोबरला वर्ल्ड सिरीज (बेसबॉल चॅम्पियनशिप) दरम्यान दाखवलेल्या एका दूरदर्शन जाहिरातीत रीगन यांच्या 1987 च्या भाषणाचे विकृतीकरण केले आहे.

रिपोर्टनुसार, ही जाहिरात ऑंटारियो सरकारने सुमारे 7.5 कोटी डॉलर्स खर्चून तयार केली होती. जाहिरातीत दाखवले गेले होते की रीगन टॅरिफच्या विरोधात होते, मात्र ट्रम्प यांनी हा दावा “खोटा” ठरवला. त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’ वर लिहिले, “रोनाल्ड रीगन राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि अर्थव्यवस्थेच्या हितासाठी टॅरिफचे समर्थन करत होते, पण कॅनडाने म्हटले की ते विरोधात होते! ही जाहिरात तात्काळ हटवायला हवी होती, पण त्यांनी ती वर्ल्ड सिरीजदरम्यान प्रसारित होऊ दिली.”

ट्रम्प पुढे म्हणाले, “तथ्यांचे चुकीचे सादरीकरण आणि शत्रुत्वपूर्ण वर्तनामुळे मी कॅनडावर आणखी 10 टक्के टॅरिफ वाढवत आहे.” सध्या कॅनडाच्या अनेक उत्पादनांवर 35 टक्के शुल्क आणि ऊर्जा उत्पादनांवर 10 टक्के शुल्क लागू आहे. मात्र ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ कोणत्या उत्पादनांवर लागू होईल, हे स्पष्ट केले नाही.

या जाहिरात-विवादामुळे दोन्ही देशांमधील आधीच अस्तित्वात असलेला तणाव अधिक वाढला. काही आठवड्यांनंतर, आशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी ट्रम्प यांनी कार्नी यांची भेट घेण्यास नकार दिला. व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले, “नाही, माझी त्यांच्याशी भेटण्याची कोणतीही योजना नाही.” त्यानंतर लगेचच त्यांनी टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली आणि कॅनडावर “खोटी जाहिरात” दाखवल्याचा आरोप केला. ट्रम्प यांनी हेही म्हटले की, “कॅनडा आता स्वतःला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande