अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती; नियोजनभवनात जिल्हास्तरीय कार्यक्रम
अकोला, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियोजनभवनात आज झाला. या कार्यक्रमात ७९ अनुकंपा व ६१ एमपीएससी उमेदवारांना अशा १४० उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात आले
P


अकोला, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नियोजनभवनात आज झाला. या कार्यक्रमात ७९ अनुकंपा व ६१ एमपीएससी उमेदवारांना अशा १४० उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्यात आले.

`राज्यात आज ५ हजार १८७ अनुकंपा उमेदवारांना, तसेच ५ हजार १२२ एमपीएससी उमेदवारांना अशा एकूण १०,३०९ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. त्याचे थेट प्रक्षेपण नियोजनभवनात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात करण्यात आले.` खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलिस अधिक्षक अर्चित चांडक, महापालिका आयुक्त सुनील लहाने, उपवन संरक्षक सुमंत सोळंके, अति. जिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते.

प्रशासनाने ‘फास्ट ट्रॅक’वर ही प्रक्रिया पार पाडली. आज राज्यभर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नोकरी मिळत आहे. शासनाने विशेष मोहिम आखून अनेक कुटुंबांना न्याय मिळवून दिला आहे, असे आमदार श्री. सावरकर यांनी सांगितले. राज्यात एकूण १०,३०९ उमेदवारांना एकाचवेळी नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम होत आहे. हा ऐतिहासिक क्षण असल्याचे आमदार श्री. मिटकरी यांनी सांगितले. अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया ‘मिशन मोड’वर राबविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सांगितले. जिल्ह्यात नियुक्तीपत्र वितरित करण्यात आलेल्या उमेदवारांत राज्य शासनाचे ५२, ग्रामविकास विभागातील २२, नगरविकास विभागातील १, गृह विभागातील ४ अशा ७९ उमेदवारांचा समावेश आहे. लिपीक- टंकलेखक भरतीत एमपीएससी नियुक्त ६१ उमेदवारांनाही नियुक्तीपत्रांचे वितरण झाले. अधिक्षक श्याम धनमने यांनी सूत्रसंचालन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande