सोनम वांगचुक यांच्यासाठी अकोल्यात कँडल मार्च
अकोला, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते, सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अकोल्यात भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. हा शांततामय मोर्चा गांधी जवाहर बाग येथून सुरू होऊन हुतात्मा स्मारक येथे संपन्न झाला. या कॅण्डल मार्चमध्ये सा
P


अकोला, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते, सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अकोल्यात भव्य कॅण्डल मार्च काढण्यात आला. हा शांततामय मोर्चा गांधी जवाहर बाग येथून सुरू होऊन हुतात्मा स्मारक येथे संपन्न झाला. या कॅण्डल मार्चमध्ये सामाजिक, शैक्षणिक, पत्रकार, शिक्षक, महिला आणि शेतकरी संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.शेतकरी नेते प्रकाश पोहरे म्हणाले की, सरकारने लोकशाहीवरील हे दडपशाहीचे धोरण तात्काळ थांबवावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande