अकोल्यात महिला दलीत असल्याचं समजताच हॉटेलच्या मॅनेजरने नाकारली रूम !
अकोला, 4 ऑक्टोबर (हिं.स) दलित असल्याचं कळताच अकोल्यातील एका हॉटेलच्या मॅनेजरने वंचित बहुजन आघाडीच्या एका महिला पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली. आता याबाबतची तक्रार अकोल्यातील सिविल लाईन पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली
प


अकोला, 4 ऑक्टोबर (हिं.स)

दलित असल्याचं कळताच अकोल्यातील एका हॉटेलच्या मॅनेजरने वंचित बहुजन आघाडीच्या एका महिला पदाधिकाऱ्यांना प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली. आता याबाबतची तक्रार अकोल्यातील सिविल लाईन पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. शहरातील सिविल लाईव्ह पोलिसांनी याप्रकरणी ॲट्रॉसिटीच्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार काल अकोल्यामध्ये काल धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष डॉ.स्नेहल सोहनी या अकोल्यात आल्या होत्या. यादरम्यान त्या रायझिंगसन या हॉटेलमध्ये मुक्कामासाठी रूम करण्यासाठी गेल्या असता त्यांना सुरुवातीला हॉटेल चालकाकडून रूम दाखवण्यात आली. त्यानंतर फिर्यादी सोहनी या आपल्या गाडीतील सामान काढून आणण्यासाठी हॉटेलच्या बाहेर गेल्या असता त्या परत आल्यानंतर हॉटेल चालकांनी त्यांच्या सामानामध्ये पंचशील व निळे ध्वज दिसल्यामुळे हॉटेल मॅनेजर ने सोहनी यांना प्रवेश नाकारला. त्यांना प्रवेश नाकारण्याची वेगळे कारण देण्यात आले असले तरी याप्रकरणी स्नेहल सोहनी यांनी हॉटेल चालकावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली याप्रकरणी आता सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये हॉटेलच्या मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला सध्या अटक करण्यात आली नसली तरी पोलीस आता सखोल तपास करीत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande