अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.)
सव्वा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. सप्टेंबरमधील पावसामुळे नुकसानग्रस्त क्षेत्र वाढले असताना जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याची नजरअंदाज आणेवारी पन्नास पैशांपेक्षा अधिक म्हणजे सरासरी ५६ पैसे काढली आहे. या आणेवारीमुळे जिल्ह्यास दुष्काळी स्थितीतील मदत मिळण्यास अडचणी जाणार असल्याने शेतकऱ्याऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामास चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या संयुक्त पचनाम्यात एक लाख २३ हजार ७६३ हेक्टरमधील सोयाबीन, कापूस, तूर मूग, उडीद व मक्यासह संत्रा तसेच भाजीपाल्याचे पीक बाधित झाल्याचे म्हटले आहे. या क्षेत्रातील पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. १ लाख ६८ हजार ५३३ शेतकऱ्यांना हा फटका बसला असून १०८.७१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये सतत झालेल्या पावसाने उर्वरित क्षेत्रातील पिकांना पोहोचली असून त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. यंदा खरीप हंगामातील उत्पादनाची सरासरी चागलीच पटण्याची शक्यता आहे.
पावसाने झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नजअंदाज आणेवारी जाहीर केली आहे जिल्ह्याची आणेवारी सरासरी ५६ पैसे इतकी काढण्यात आली. सर्वात कमी आणेवारी धारणी तालुक्याची अन्नून ती ५२ पैसे आहे, तर भातकुली व मोर्शी तालुक्याची ६० पैसे आहे.जिल्ह्यातील चौदापैकी एकाही तालुक्यची आणेवारी पन्नाच पैशांपेक्षा कमी नसल्याने दुष्काळातील सवलतीपासून जिल्हा वंचित राहण्याची शक्यता आहे.
अतिम आणेवारी काय निघेल, यावर ते अवलंबून असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नदरअंदाज आणेवारीवर शेतकन्यांनी चागलाच रोष व्यक्त केला.
अशी आहे तालुकानिहाय आणेवारी (पैसे)
धारणी-५२, भातकुली-६०. मोर्शी-६०, अचलपूर-५१, अंजनगावसुर्जी-५७. तिवसा-५७, चिखलदरा-५७. धामणगाव रेल्वे-५६. नांदगाव खंडेश्वर-५४, चांदूर रेल्वे-५४, अमरावती-५३. दर्यापूर-५३
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी