अमरावती, 4 ऑक्टोबर (हिं.स.)
धारणी तालुक्यातील हरिसाल गावातील २० वर्षीय नवप्रसूता रुपाली अजय धांडे हिचा आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.रुपाली सात महिन्यांची गर्भवती होती. काल उशिरा रात्री तिच्या घरीच प्रसूती झाली होती. दुर्दैवाने मृत बाळाचा जन्म झाला आणि त्यानंतरच तिची प्रकृती अचानक खालावली. तातडीने तिला धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी रुपालीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळले आहे.या घटनेमुळे ग्रामीण भागातील गरोदर मातांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आरोग्य यंत्रणेने तत्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी