बीड जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती आदेश वितरण सोहळा संपन्न
बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले
नियुक्ती आदेश वितरण सोहळा


बीड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.

या मेळाव्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले लिपिक-टंकलेखक संवर्गातील ६४ उमेदवार

अनुकंपा तत्वावरील गट-क संवर्गातील ३६ उमेदवार

अनुकंपा तत्वावरील गट-ड संवर्गातील ०८ उमेदवार

अशा एकूण १०८ उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर जिल्हाधिकारी हरीष धार्मिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते.

अनुकंपा तत्वावरील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देऊन शासनाने दिलासा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande