मध्य रेल्वेकडून खारबाव ते जुचंद्र विभागात विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक
मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मध्य रेल्वे, मुंबई विभाग, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भातील कामासाठी खारबाव RFO (किमी ६६/२५-३१) येथे ओपन वेब गिर्डर लाँचिंगसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक दि. ६.१०.२०२५ रोजी ००.०० ते ०४.०० वाज
मध्य रेल्वेकडून खारबाव ते जुचंद्र विभागात विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक


मुंबई, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मध्य रेल्वे, मुंबई विभाग, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भातील कामासाठी खारबाव RFO (किमी ६६/२५-३१) येथे ओपन वेब गिर्डर लाँचिंगसाठी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेणार आहे.

हा ब्लॉक दि. ६.१०.२०२५ रोजी ००.०० ते ०४.०० वाजेपर्यंत खारबाव आणि कामन रोड दरम्यान अप व डाउन मुख्य मार्गावर परिचालित राहील.

ब्लॉकमुळे मेल व एक्सप्रेस गाड्यांचे नियोजन पुढीलप्रमाणे राहील :-

• गाडी क्र. 11049 (अहमदाबाद - कोल्हापूर एक्सप्रेस) वसई रोड येथे ०३.३० ते ०४.०० वाजेपर्यंत नियंत्रित केली जाईल.

• गाडी क्र. 22193 (दौंड - ग्वाल्हेर सुपरफास्ट एक्सप्रेस) भिवंडी रोड येथे ०३.४९ ते ०४.०० वाजता नियंत्रित केली जाईल.

• गाडी क्र. 12297 (अहमदाबाद - पुणे दुरंतो एक्सप्रेस) साधारण १०-१५ मिनिटांनी उशिराने पोहोचू शकते.

हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande