छ. संभाजीनगर : भाजप आ. चव्हाण यांना पती अतुल चव्हाण यांचे पत्र; माझे फोटो वापरू नका
छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपले फोटो मतदार संघात कुठल्याही बॅनरसाठी वापरू नये याबाबत निवेदन पत्र फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराध
अ


छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपले फोटो मतदार संघात कुठल्याही बॅनरसाठी वापरू नये याबाबत निवेदन पत्र फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार अनुराधा चव्हाण यांना दिले. विशेष म्हणजे आमदार अनुराधा चव्हाण यांचे अतुल चव्हाण हे पती आहेत.तसेच संभाजीनगर येथेच कार्यरत आहेत या पत्राची आमदार चव्हाण यांनी तात्काळ दाखल घेतली आहे. त्यावर कार्यवाही करत अशा प्रकारे कुठल्याही बॅनरवर त्यांचे फोटो येता कामा नये या संदर्भात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिली आहे. अशी माहिती आमदार चव्हाण यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande