चंद्रपूर : २८५ जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे
चंद्रपूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ अनुकंपाधारक आणि ८३ सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण २८५ जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक
चंद्रपूर : २८५ जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे


चंद्रपूर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ अनुकंपाधारक आणि ८३ सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण २८५ जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे अनुकंपाधारक व सरळ सेवा भरती उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ अनुकंपाधारक आणि ८३ सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण २८५ जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यात मनिष दहिवले, सरिता मेश्राम, संदीप किटे, दिवेश भैसारे, समित्र कुमरे, राज सलामे, नम्रता करमळकर, राकेश आष्टेकर, प्रगती मार्लेवर, संतोष घाटोडे, शितल पाटोळे, शितल पुल्लावार, कविता उमरे, शिवम मडावी, कृष्णा सातपुते, विश्वास इटणकर, सिद्धेश तायडे, सरोज ब्राह्मणे, तन्वी सिडाम, यांच्यासह सेवा पंधरवडा अभियानातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच सर्वांसाठी घरे अंतर्गत आदेश वाटप, वन हक्क पट्टे वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande