तपासात हलगर्जीपणा केल्याच्या संशयातून नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक
कळवण, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। शेती कामासाठी गेलेल्या युवकाचे शेतमालकाने अपहरण करून खून केल्याची भावना झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी कळवण पोलीस ठाणे वरती दगडफेक केल्याची घटना जिल्ह्यातील कळवण येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान याम
बेपत्ता तरुणाच्या तपासात हलगर्जी केल्याच्या संशयातून नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक,


बेपत्ता तरुणाच्या तपासात हलगर्जी केल्याच्या संशयातून नागरिकांची पोलीस ठाण्यावर दगडफेक,


कळवण, 4 ऑक्टोबर, (हिं.स.)। शेती कामासाठी गेलेल्या युवकाचे शेतमालकाने अपहरण करून खून केल्याची भावना झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी कळवण पोलीस ठाणे वरती दगडफेक केल्याची घटना जिल्ह्यातील कळवण येथे घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान यामुळे मोठा तणाव कळवण तालुक्यात निर्माण झाला आहे.

या सर्व प्रकरणी अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यामध्ये असलेल्या कळवण खुर्द या ठिकाणी राहणारा विठोबा गुलाब पवार हा युवक येथेच असलेले बापू त्रंबक शिंदे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करत होता. काल शुक्रवारी हा युवक नेहमीप्रमाणे शेतमजुरीसाठी गेला परंतु तो परत आलाच नाही. त्यामुळे विठोबा पवार यांच्या घरच्यांनी बराच वेळ शनिवारी त्याची वाट बघितली परंतु तो आला नाही. त्याबाबत चौकशी करण्यासाठी शिंदे यांच्या कडे गेल्यानंतर त्यांनी देखील समाधानकारक उत्तरे दिली नाही.

या सर्व प्रकरणी विठोबा गुलाब पवार याची आई सावित्री गुलाब पवार हिला संशय आल्यामुळे तिने तातडीने पोलीस ठाणे गाठून या ठिकाणी कळवण पोलिसांकडे मुलगा विठोबात गुलाब पवार हा बेपत्ता झाल्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल केला हा गुन्हा दाखल करत असताना शेतमालक बापू त्रंबक शिंदे आणि त्यांचा मुलगा राहुल शिंदे यांच्यावरती संशय देखील व्यक्त केलेला होता गुन्हा दाखल होऊनही आपल्या मुलाचा शोध लागत नाही. पोलीस काही करत नाही. या भावनेतून पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये जमा झालेल्या संतप्त नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी दुपारच्या सुमारास पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे कळवण शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी या ठिकाणी जास्त ची कुमक तैनात केली सुमारे अर्धा तास होऊनही नातेवाईक या ठिकाणावरून जाण्यास तयार नव्हते त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. पोलीस काही माहिती सांगत नव्हते त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक यांनी ग्रामस्थांनी पोलिसांनी लाठीचार्ज करण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर पोलीस ठाण्यावरती दगडफेक केली. यामध्ये या ठिकाणी असलेले चार - पाच पोलीस आणि काही नागरिक तसेच पत्रकार जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. यामुळे कळवण शहरासह तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande