अकोला, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
आज ग्राम कुरुम येथे आरोपी बबलू पवन्या पवार (वय ३५, ता. मुर्तीजापूर) याच्या घरावर छापा टाकण्यात आला. छाप्यात त्याच्याकडून अवैधरित्या विक्रीस ठेवलेली १५ लिटर गावठी दारू (कींमत ३,००० रुपये) व अॅल्युमिनियमचा डबा (कींमत ५०० रुपये) असा एकूण ३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखडे व पोलीस शिपाई आकाश काळे यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे