दिल्ली-एनसीआर परिसरात ४०० ई-वाहनांद्वारे स्वच्छ वाहतूक क्रांती
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : शाश्वत आणि हरित वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत भारतातील प्रमुख शहरांमध्ये दर्जेदार वाहन सेवा पुरविणाऱ्या रेफेक्स समूहाच्या ''क्लीन मोबिलिटी'' विभागाने, मुंबई पाठोपाठ दिल्ली-एनसीआरमध्ये त्याच्या ''क्लीन ड्र
मंत्री प्रल्हाद जोशी


नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर (हिं.स.) : शाश्वत आणि हरित वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत भारतातील प्रमुख शहरांमध्ये दर्जेदार वाहन सेवा पुरविणाऱ्या रेफेक्स समूहाच्या 'क्लीन मोबिलिटी' विभागाने, मुंबई पाठोपाठ दिल्ली-एनसीआरमध्ये त्याच्या 'क्लीन ड्राइव्ह' उपक्रमाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, कंपनी पुढील तीन महिन्यांत राजधानी परिसरात ४०० नवीन इलेक्ट्रिक चारचाकी वाहने तैनात करेल, ज्यामुळे कॉर्पोरेट वाहतुकीसाठी पर्यावरणास अनुकूल पर्याय उपलब्ध होईल.

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते नुकताच हा महत्त्वाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मंत्री जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील 'नवीकरणीय ऊर्जा' धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले. मंत्री जोशी म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांची खरी बांधिलकी सिद्ध करण्यासाठी, त्यांना सौर-ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग प्रणालीशी जोडणे आवश्यक आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी सौर-ऊर्जेवर चालणाऱ्या ई-वाहनांचा ताफा (fleet) स्वीकारला पाहिजे, ज्यामुळे तेलाची आयात कमी होईल, उत्सर्जन घटेल आणि हरित शहरे निर्माण करून ESG नियमांचे पालन सुनिश्चित होईल.

रेफेक्स मोबिलिटीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले,की, दिल्ली- एनसीआरमधील हा विस्तार केवळ वाढ नाही, तर शाश्वत भविष्यासाठी आमची वचनबद्धता आहे. आम्ही लवकरच या विभागात सर्वात मोठे कॉर्पोरेट स्वच्छ ऊर्जा वाहतूक पुरवठादार होऊ. अनिरुद्ध अरुण (मुख्य कार्यकारी अधिकारी, रेफेक्स मोबिलिटी) यांनी कंपनीचा 'विश्वसनीय ताफा, उत्कृष्ट चालक अनुभव आणि शाश्वतता' या तीन स्तंभांवरील विश्वास व्यक्त केला. सध्या कंपनीकडे चेन्नई, बंगळूर, हैदराबाद आणि मुंबई येथे १,४०० ई-वाहनांचा ताफा आहे आणि त्यांनी आतापर्यंत ३५ लाख किलोग्रामहून अधिक CO 2 उत्सर्जन कमी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande