पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.) -
देवेंद्र फडणवीस हे फार कंजूस माणूस आहेत. त्यांनी पुण्यातून पेशव्यांचा आदर्श घ्यायला हवा होता. पेशवे हे फार दिलदार माणसं होती. जसं की नाना फडणवीस. मात्र देवेंद्र फडणवीस हे फक्त 1000 ची पैज लावत आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर. भाषणामधून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई द्यायला हवी यावर भाष्य केलं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकलं मात्र जेव्हा ते शेतकऱ्यांच्या बाबत बोलत होते. तेव्हा फडणवीस हे कानामध्ये बोळा घालून बसले होते का? असा सवाल ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी उपस्थित केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसऱ्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणामध्ये विकासाचा मुद्दा दाखवा आणि हजार रुपये घ्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मात्र त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरती भाष्य केले नसल्याची माहिती आपल्याला मिळाली असल्याने आपले 1000 रुपये वाचले अशी मिश्किल टिपणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु