धाराशिव : झाड आणि प्रवेशद्वारावर बसलेले आंदोलक खाली आले
छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विनंतीला मान ठेवून झाड आणि प्रवेशद्वारावर बसलेले आंदोलक खाली आले मागील चार दिवसांपासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शेतकरी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज
अ


छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या विनंतीला मान ठेवून झाड आणि प्रवेशद्वारावर बसलेले आंदोलक खाली आले मागील चार दिवसांपासून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शेतकरी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला, जेव्हा काही भगिनींनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी झाडावर व प्रवेशद्वारावर चढून आंदोलन सुरू ठेवले. याची माहिती मिळताच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन आंदोलक महिलांशी संवाद साधला. त्यांनी शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन करत झाडावरून आणि प्रवेशद्वारावरून खाली उतरण्याची विनंती केली. आमदार पाटील यांच्या विनंतीला मान देत आंदोलक भगिनींनी तत्काळ झाडावरून खाली येऊन आंदोलनस्थळी परतल्या. यानंतर आमदार पाटील यांनी आमरण उपोषण सुरू ठेवणाऱ्या शेतकरी बांधवांशी थेट संवाद साधला. त्यांच्या सर्व मागण्यांची माहिती घेतली. बहुतांश मागण्या जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर उर्वरित काही मागण्यांवर येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे सांगितले. आंदोलन मंगळवारपर्यंत स्थगित ठेवण्याची विनंती आमदार पाटील यांनी आंदोलकांना केली. तसेच उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीबाबत प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सरसकट मदत मिळेपर्यंत आपण आग्रही पाठपुरावा करणार असल्याचा शब्दही आमदार पाटील यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande