लातूर - अनुकंपा व लिपिक भरती प्रक्रियेतील १७४ जणांना नियुक्ती आदेशांचे वितरण
लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्ह्यातील अनुकंपा व लिपिक भरती प्रक्रियेतील १७४ जणांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सरळसेवेने लिपीक टंकलेखक व अनुकंपाद्वारे गट क व गट ड संवर्ग
अनुकंपा व लिपिक भरती प्रक्रियेतील १७४ जणांना नियुक्ती आदेशांचे वितरण!


लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।

आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात लातूर जिल्ह्यातील अनुकंपा व लिपिक भरती प्रक्रियेतील १७४ जणांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे सरळसेवेने लिपीक टंकलेखक व अनुकंपाद्वारे गट क व गट ड संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. प्रसंगी सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी समवेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मनपा आयुक्त मानसी मीना सह विविध मान्यवर उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande