परभणी : दिवाळी शॉपिंग व फराळ महोत्सवाचे उद्घाटन
परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालयात जिजाऊ सावित्री महिला बचत गटाच्या वतीने आयोजित दिवाळी शॉपिंग व फराळ महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते संपन्न झाले.
दिवाळी शॉपिंग व फराळ महोत्सवाचे उद्घाटन


परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील जागृती मंगल कार्यालयात जिजाऊ सावित्री महिला बचत गटाच्या वतीने आयोजित दिवाळी शॉपिंग व फराळ महोत्सवाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन माननीय शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी बोलताना आनंद भरोसे यांनी म्हटले की, “महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची आणि सशक्तिकरणाची खरी क्रांती या शॉपिंग महोत्सवासारख्या उपक्रमांतून घडते. बचत गटांमुळे महिलांना आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वतःची ओळख मिळाली आहे.” यांनी पुढे सांगितले की, “बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या दर्जेदार स्थानिक वस्तूंमुळे ‘लोकल फॉर व्होकल’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने बळ मिळत आहे. महिलांच्या हातून तयार झालेल्या वस्तू पाहून खरेदीचा मोह आवरता आला नाही,” असे भरोसे म्हणाले.

या वेळी नवरचना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रल्हाद मोरे, कविवर्य केशव खटींग, जागृती ट्रस्टचे विश्वस्त प्रदीप मारमवार, आबा कारेगावकर, इं. नारायणराव चौधरी, भागवत बोबडे, दयानंद जाधव, प्रा. एम. जी. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सीमा चौधरी, रत्नमाला शेळके, सर्वेश भिसे व अभ्युदय खटींग यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. नंदा जाधव यांनी करताना परभणीतील लघुउद्योजक भगिनींसाठी “हक्काची बाजारपेठ निर्माण करण्याची गरज” अधोरेखित केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सुदाम भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. कांचन कारेगावकर यांनी केले. या प्रसंगी जिजाऊ सावित्री महिला बचत गटाच्या प्रणिता बिरादार, अश्विनी भोसले, वैशाली जाधव, अनुराधा वायकोस, संजना लकारे, वर्षा शेळके, सीमा काकडे यांच्यासह अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande