पुणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। दिवाळीपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी महापालिका प्रशासनाने एक गुड न्यूज दिली आहे. दरवर्षी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस दिला जातो.यंदाही महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळून एकूण 65 कोटी रुपयांचा बोनस मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. महापालिकेतील सर्वच विभागातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा लाभ मिळणार आहे. सहा महिन्यांपेक्षा कमी कार्यकाळ असणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. महापालिकेच्या पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच बोनसची रक्कम वर्ग करा, असा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु