परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु कार्यालयातील O.S.D. (Officer on Special Duty) डॉ. दिगंबरराव नेटके यांचा परभणी येथे आगमनानिमित्त सत्कार करण्यात आला. हा सत्कार परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे लहुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक पांडुरंग रणखांब यांच्या हस्ते त्यांच्या पत्नींसह सन्मानपूर्वक करण्यात आला.
या वेळी लोकश्रेयचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार, धनंजय रणखांब, अतुल रणखांब, डी. के. भालेराव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर डॉ. नेटके यांनी सकल मातंग समाजाच्या बेमुदत धरणे-उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली. या प्रसंगी निवृत्ती नितनवरे, एल. डी. कदम, राम गायकवाड, संविधान भिसे, हबीब पठाण, तसेच ब्राह्मणगावचे सरपंच काळदाते आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या भेटीदरम्यान डॉ. नेटके यांनी समाजातील ऐक्य, शिक्षण आणि हक्कांसाठी सातत्याने लढण्याचे आवाहन केले. त्यांनी संघटनात्मक बळ वाढवून समाजातील युवकांनी शिक्षण, प्रशासन आणि सेवाक्षेत्रात अधिक पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis