त्रंबकेश्वर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। । येथून पाच हजार हजारो कावडीधारक बणी गडाक खाना झाले. कोजागिरी पौणिर्णमला मध्यरात्री गोदावरीच्या तीथनि समशृंगी देवीस अभिषेक करण्यात येणार आहे. कुशावर्तावरून पाणी भरून सजवलेली कावड खांद्यावर घेत तर काहींनी गंगाजल लोटा सोबत घेत कावडीचा पायी प्रवास गडाकडे सुरू केला होता. यात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. कुशावर्त तीर्थावरून कावडीची पूजा करून बात गोदावरीचे तीर्थ लोट्यामध्ये भाविकांनी भरले. कावड नेण्याची प्रथा पूर्वीची असून काही वर्षांपासून देवीची पालखी नेण्याची प्रथा येथील गुरू गोरक्षनाथ आखाड्याशी संबंधित नाथ संप्रदायातील साधूनी सुरू केली. मच्छिंद्रनाथांनी देवीसाठी कावड नेली होती. या पौराणिक आख्यायिकेवरून देवीसाठी जलाभिषेक करण्याची प्रथा पडल्याचे नाथ संप्रदायातील साधूनी सांगितले. महंत सत्यनाथ महाराज पालखीसोबत आहेत. त्र्यंबकेश्वर येथून देखील युवक सहभागी आहेत, अशी माहिती बापू दशपुत्रे यांनी दिली. तीन दिवस प्रवास कावड नेण्यासाठी बाहेरगावावरून आलेले आणि स्थानिक चार ते पाच हजार कावडी झाल्यावर रखाना झाले आहेत. सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्री गोदावरी जलाचा अभिषेक कावडीधारक सप्तशृंगी देवीस करतील. ढकांचे, नाशिक येथे पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम वणी गावात देवी मंदिर व तिसऱ्या दिवशी वणी गावातून डोंगरावर चढून समशृंगी देवीस अभिषेक कावडीधारक घालतील
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV