आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत द्यावी - अमित देशमुख
लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)अतिवृष्टीच्या काळात आलेल्या महापुरात पिकांसह जमीन खरडून गेल्यामुळे चिंताग्रस्त बनलेले जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथील शेतकरी मारोती संग्राम रायकवाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी आहे.
आमदार अमित देशमुख


लातूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)अतिवृष्टीच्या काळात आलेल्या महापुरात पिकांसह जमीन खरडून गेल्यामुळे चिंताग्रस्त बनलेले जळकोट तालुक्यातील बेळसांगवी येथील शेतकरी मारोती संग्राम रायकवाडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी आहे. या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देऊन आधार द्यावा, अशी मागणी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शासनाकडे मागणी करीत आहे.

मागच्या महिनाभरातील अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले , त्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत अडचणीत सापडला आहे ही वस्तुस्थिती आहे, या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील आहेत, ही मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये अशी विनंती आ.अमित विलासराव देशमुख यांनी सर्वांना केली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande