परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे प्रयत्न: शिवाजीराव भरोसे
परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील प्रभाग ०५ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या विकासकामांना पालकमंत्री आ. मेघना ताई बोर्डीकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. रामप्रसादजी बोर्डीकर आणि मंत्री सुरेशराव वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाचा ल
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाचे प्रयत्न: शिवाजीराव भरोसे


परभणी, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील प्रभाग ०५ मध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या विकासकामांना पालकमंत्री आ. मेघना ताई बोर्डीकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. रामप्रसादजी बोर्डीकर आणि मंत्री सुरेशराव वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला.

सुयोग कॉलनी येथे गोकुळ दाड ते संकेत शिंदे यांच्या निवासस्थाना पर्यंत ३५ लाख रुपये खर्चाच्या डांबरी रस्त्याचे, ज्ञानेश्वर नगर येथे खरबे ते महाजन यांच्या घरापर्यंत २५ लाख रुपये खर्चाच्या डांबरी रस्त्याचे, तसेच लोकमान्य नगर येथे भरोसे ते दुधाटे यांच्या घरापर्यंतच्या डांबरी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे भूमिपूजन महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे आणि समशेर भैय्या वरपूडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रितेश जैन झाबंड, बबलू उर्फ गणेश टाक, शंकर आजेगावकर, स्पंदन देवडे, ओम मुदिराज, तसेच भाजप पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना शिवाजीराव भरोसे म्हणाले, “केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री देखील भाजपच्या आहेत. त्यामुळे व्यक्ती, धर्म किंवा जात न पाहता सर्वांनी एकजुटीने कमळ चिन्हाला मतदान करून या वेळी भाजपचा महापौर निवडून द्यावा,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. या भूमिपूजनामुळे प्रभागातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते मिळणार असून, स्थानिक पातळीवर वाहतुकीची सुलभता आणि स्वच्छतेत मोठी सुधारणा होणार आहे. नागरिकांनीही या विकासकामांचे स्वागत केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande