कोल्हापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)राज्यभरात असंख्य हिंदु युवती आणि महिला ‘लव्ह जिहाद’च्या षडयंत्राला बळी पडलेल्या आहेत. हे षडयंत्र रोखण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्याकडे यांच्याकडे केली. या वेळी आबीटकर यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. याच मागणीचे निवेदन भाजपचे खा. धनंजय महाडिक आणि भाजपचे आ. अमल महाडिक, तसेच शिवसेनचे आ. राजेश क्षीरसागर यांनाही देण्यात आले. या सर्वांनीही ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
‘लव्ह जिहाद’ हे केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतर, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मानवी तस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री अन् आतंकवादी कारवायांत सहभाग यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’ला असंख्य हिंदु युवती आणि महिला बळी पडल्या आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा संमत करावा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभियान राबवले जात आहे.
या वेळी युवती आणि महिला यांनी हातात वैशिष्ट्यपूर्ण फलक धरले होते. या फलकांवर ‘हिंदू मुलींना लव्ह जिहाद विषयात जागृत करणारी, मी ही माता दुर्गेचे रूप बनेन ! ‘मै हूं दुर्गा’ , असा मजकूर लिहिण्यात आला होता. या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कैलास दीक्षित, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री मनोजकुमार चौगुले, संजय माळी, दिलीप दळवी, घन:शामभाई पटेल, भाजपच्या महिला सरचिटणीस वंदनाताई बंबलवाड, हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिभा तावरे यांसह अन्य उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar