जम्मू, ४ ऑक्टोबर (हिं.स.). जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील एका गावावर पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालताना दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानकडून ड्रोनसारखी वस्तू येत असल्याचे आणि रामगड सेक्टरमधील नांगा गावावर घिरट्या घालताना दिसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा दल आणि पोलीस पथकांना तातडीने या भागात शोध घेण्यासाठी आणि सीमेपलीकडून कोणतेही ड्रग्ज किंवा शस्त्रे हवेत टाकली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी तैनात करण्यात आले. खबरदारी म्हणून जवळच्या गावांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे