छत्रपती संभाजीनगर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात अनुकंपा भरतीतील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार श्री. बबनराव लोणीकर स माजी मंत्री श्री. अर्जुनराव खोतकर , जालना जिल्हाधिकारी सौ. आशिमा मित्तल, जालना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. अजयकुमार बनसल, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष बनसोडे, जालना महानगरपालिका आयुक्त श्री. संतोष खांडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सौ. रिता मेत्रेवार, जिल्हा पुरवठा अधिकारी सौ. सविता चौधर, निवासी जिल्हाधिकारी श्री. शशिकांत हदगल, भगवान मात्रे पाटील, पंडितदादा भुतेकर तसेच सर्व अनुकंपा भरतीतील उमेदवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या १५० दिवसीय कृती कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती गट कवृत्त परिवार तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग शिफारस प्राप्त लिखित अंक लेखक संवर्गातील उमेदवारांना नियुक्ती आदेश वाटपाचा ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या ऑनलाइन कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार हे उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis