आता ई-केवायसी केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ
सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थींची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार योजनेतील अविवाहित लाभार्थींना वडिलांची तर विवाहितांना त्यांच्या पतीची देखील ई- केवायसी करावी लागणार आहे
आता ई-केवायसी केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ


सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थींची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार योजनेतील अविवाहित लाभार्थींना वडिलांची तर विवाहितांना त्यांच्या पतीची देखील ई- केवायसी करावी लागणार आहे. त्यातून लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीत मिळणारा लाभ लांबणीवर पडणार आहे.लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातील दोन कोटी ५९ लाख महिलांनी अर्ज केले. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. मार्च २०२५ पासून योजनेतील लाभार्थींची निकषांच्या आधारे चाळणी सुरू झाली. शेवटच्या टप्प्यात आता राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यातून वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले लाभार्थी शोधले जाणार आहेत. नव्या निर्णयानुसार लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या महिलेचा लाभ बंद होईल. लाभार्थी महिलेचा विवाह झालेला असल्यास पतीचे आणि विवाह झालेला नसल्यास त्यांच्या वडिलांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी त्यातून केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande